सांगली - इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 25 रुग्ण सापडल्याने त्याठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता. तो कंटेन्मेंट झोन मोठा असल्याने आणि नागरिकांना विश्वासात घेवून न केल्याने रात्रीत उध्वस्त करण्यात आला. तेथील पत्रे काढून टाकत नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावण निर्माण झाले. तेथे तातडीने पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला. <br /><br />व्हिडीओ - उल्हास देवळेकर